परुळेकरांच्या ओल्या पार्ट्यांची माहिती दिल्यास त्यांचेच पक्षश्रेष्ठी करतील पक्षातून हकालपट्टी
शिशिर परुळेकर यांचे लोकसभा उमेदवारीबाबत चे स्टेटमेंट बालिश – दिलीप घाडीगांवकर
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य शिशिर परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारास आमचा विरोध राहील, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना कळसुली विभाग प्रमुख दिलीप घाडीगावकर सर्व प्रथम जाहिर निषेध करतो. कारण महाराष्ट्र राज्यात शिवसेना भा.ज.पा. राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे महायुतीचे सरकार आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ आहे. लोकसभेची उमेदवारीकोणाला द्यावी याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. परंतु शिशिर परुळेकर यांनी शिवसेनेच्या उमेदवारास आपला विरोध असल्याचे जाहिर करूनआपल्या राजकीय बालिश पणाचे प्रत्यंतर मांडले आहे. एकदा नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या व आता इतरांच्या मदतीने स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्यामुळे पुन्हा भा.ज.पा. पक्षातील वरिष्ठांना खुश करण्याकरिता अशा प्रकारची बेताल वक्तव्य ते करत आहेत. शिशिर परुळेकरयांचे आचार – विचार – वागणूक विचारात घेतल्यास भा.ज.प. पक्षालाचआत्मचिंतन करण्याची गरज लागू शकते. शिशिर परुळेकरांचा रोजचा दिनक्रम मु.पो. गांगो मंदिर येथे उ. बा. ठा. सेनेच्या मोजक्या कार्यकर्त्या सोबत मर्यादित असतो, त्यांच्या रात्रीच्या ओल्या पायांची माहिती भा.ज.प. पक्षाच्या वरिष्ठांना दिली तर, पक्षातून हाकालपट्टी करण्यापलीकडे भा.ज.प. पक्ष श्रेष्ठीना गत्यंतर राहणार नाही. शिशिर परुळेकर यांना माझा सल्ला आहे की, लोकसभाउमेदवारीची चिंता सोडा साध्या ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्ही सांगितलेल्याकार्यकर्त्याला उमेदवारी देण्याइतका हि विचार भा.ज.पा. श्रेष्ठी करत नाहीतत्यामुळे त्यांनी पक्षातील स्वतः चे स्थान व पात्रता ओळखावी तसेच अशा प्रकारे बेताल वक्तव्य करून महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम शिशिर परुळेकर यांनी थांबवावे असा सल्ला शिवसेना कळसुली विभाग प्रमुख दिलीप घाडीगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.