करवीर मतदार संघात एका शेतकऱ्याने आपली बागायती पाच एकर जमीन पैजेच्या बोलीत लावली
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी भुदरगड विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली.तालुक्यात गावोगावी सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे की कोणता उमेदवार किती मतांनी विजयी होणार,कोणत्या भागातून लीड कोणाला मिळणार असे प्रश्न उपस्थित करून पैजा लागत आहेत.या शिवाय विविध प्रकारच्या अफवाना उत आला आहे.संपूर्ण मतदारसंघात चूरशीने मतदान पार पडले.राधानगरी भुदरगड आजरा मतदार संघात के पी पाटील,प्रकाश आबिटकर आणि ए वाय पाटील यांच्यात प्रामुख्याने लढत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.उमेदवाराचे समर्थक मोठ्या इर्षेने रोख रकमेच्या पैजा लावत आहेत.करवीर मतदार संघात पैजेखातर प्लॉटिंग जमीन एका बहदराने लावली आहे.तर एका शेतकऱ्याने आपली बागायती पाच एकर जमीन पैजेच्या बोलीत लावली आहे.
राधानगरी तालुका हा मतदान प्रक्रियेच्या बाबतीत संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो.या मतदार संघातील जनतेची मते कोणाच्या पथ्यावर पडणार याची खात्री देणे राजकीय विश्लेकासह अनेकांना कठीण ठरते.या मतदार संघातील विधानसभा निवडणूक अनेक वेळा बंडखोर उमेदवारांना विजयश्री मिळवून दिली आहे.बंडखोर उमेदवारांना अनुकूल मतदार संघ म्हणून राधानगरी विभागाला ओळखले जाते.राधानगरी मतदार संघात सात उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी खरी लढत तिरंगी आहे.के पी पाटील,प्रकाश आबिटकर ,ए वाय पाटील यांच्यात चुरस पाहण्यास मिळाली.तेवीस नोव्हेंबर रोजी निकालाचे स्पष्टीकरण मिळणार आहे.मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांना उसंत मिळाली ,नेते मंडळी प्रचार कार्यातून विसावा म्हणून अनेकांनी कोकण ,गोवा येथे प्रयाण केले आहे.तर उत्साही कार्यकर्ते के पी पाटील की प्रकाश आबिटकर यापैकी कोण विजयी होणार याबाबत तर्क वितर्क लढवू लागले आहेत.
राधानगरी विभागामधून प्रत्येक गावात कार्यकर्त्यांच्या मध्ये निवडणुक निकाल संदर्भात पैजेचे विडे रंगत आहेत.युवा पिढीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आकर्षण असल्याने राधानगरी मधून प्रकाश आबिटकर विजयी होणार हा दावा सांगितला जात आहे तर संपूर्ण जनता महायुतीला हैराण झाल्याने आणि काँग्रेसचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने उद्धव ठाकरे शिवसेनेचे के पी पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असे आत्मविश्वासपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीने सांगितले जात आहे.अनेक ठिकाणी आपलाच उमेदवार विजयी होणार याविषयी एक हजार रुपये पंचवीस लाख रुपयांच्या पैजा लागल्या आहेत.सदर पैजे बाबत लेखी करार लिहून घेतले आहेत.राधानगरी मतदार संघात के पी पाटील समर्थक राजेंद्र भाटले यांनी पंचवीस लाख रुपयांची पैज लावली असून के पी पाटील विजयी होणार असा दावा केला आहे त्याला प्रतिउत्तर म्हणून आमदार प्रकाश आबिटकर विजयी होणार यासाठी एका कार्यकर्त्याने चौपन्न लाख रुपयांची पैज लावून आव्हान स्वीकारले आहे.तर करवीर तालुक्यतील वाशी येथील कार्यकर्त्याने राहुल पाटील विजयी होणार यासाठी दहा गुंटे प्लॉटिंग जमीन पैजे खातर लावली आहे.कार्यकर्त्यांची ईर्षा शिगेला पोहचली असून आपलाच उमेदवार विजयी होणार हा ठेका धरून समर्थक कार्यकर्ते कोणत्याही थराला जात असल्याचे राधानगरी आणि करवीर तालुक्यात पहावयास मिळत आहे.एका कार्यकर्त्याने चक्क नवीन जे सी बी पैजेखातर घोषित केला आहे.एवढेच नाही आणखी एका बहद्दरने आपल्या गोट्यातील दोन मुऱ्हा महिशी किंवा रोख दोन लाख रुपये रोख रक्कम प्रकाश आबिटकर यांच्या विजयासाठी बोली लावली आहे.कोणी तीस हजार रुपये ,तर कोणी पन्नास हजार रुपये रकमेच्या पैजा लावल्या आहेत.एकूणच निकाला आधीच इर्षेखातर पैजेचा विडा ठेवून उत्साही कार्यकर्ते प्रतिष्ठा पणाला लावत आहेत.निवडणुकीच्या निकालाच्या नादात आपण कोठे आहोत कशाची पैज लावत आहे याचे भान विसरून अनेक कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचे समर्थन करून तो निवडून येणारच अशी ठाम भूमिका मांडत आहेत.
मतदान केंद्रावर कोणत्या ठिकाणी कशी मते पडणार या बाबत अफवा मोठया प्रमाणात बाहेर पडू लागल्या आहेत.राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते ए वाय पाटील हे किती मते घेणार यावर के पी पाटील की आबिटकर यांचा निकाल लागणार आहे.शिवसेना , भाजप बाबत सुद्धा अफवाना ऊत आला आहे.या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उकल उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजलेनंतर मिळणार आहेत.राधानगरी भुदरगड मतदारसंघात सात उमेदवार रिंगणात असले तरी फक्त एकच उमेदवार विजयी होणार आहे असे खात्रीपूर्वक म्हणावे लागेल.यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मात्र कधी न पाहिलेली पैज लावण्याची ईर्षा,एकनिष्टपणा आणि आपुलकी आपल्या उमेदवारांच्या विषयी कार्यकर्त्यांच्या मध्ये दिसून आली आहे.