वेंगुर्ले (प्रतिनिधी) : विकसित भारत संकल्प यात्राच्या निमित्ताने योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचाव्यात यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे , अशी माहिती माजी आमदार व भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे दिली वेंगुर्ले तालुका भाजपा कार्यालयात राजन तेली यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते , यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई , वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप ,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल , साईप्रसाद नाईक , मनवेल फर्नांडिस ,माजी नगरसेवक श्रेया मयेकर ,प्रशांत आपटे , भूषण सारंग , प्रणव वायंगणकर , शेखर काणेकर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष पप्पू परब ,आदीं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राजन तेली म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा ही 15 नोव्हेंबर पासून देशभरात सुरू आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना पुढे आणली असून तळागाळाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा फायदा व्हावा हा उद्देश असून याबाबत अजयकुमार मिश्रा हे शनिवारी कुडाळ तालुक्यात माणगाव येथे व सावंतवाडी तालुक्यात निरवडे ग्रामपंचायत येथे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2. 30 वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑनलाईन सावंतवाडी येथे ऑनलाइन मार्गदर्शन होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील वॉरियर्स, पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजन तेली यांनी केले. या योजनेअंतर्गत अन्न सुरक्षा हमी ,महिला सक्षमीकरण योजना ,प्रधानमंत्री योजना ,पोषण आहार योजना ,आदिवासी समाजासाठी व अन्य अनेक योजना राबविल्या जात असून या योजना जनतेपर्यंत पोहोचतात या संदर्भात अभ्यासाच्या मार्गदर्शन दृष्टीने मिश्रा यांचा दौरा
आयोजित करण्यात आला आहे ,अशी माहिती राजन तेली यांनी दिली. आज अशा योजनांच्या विस्तारितरित्या राबविल्यामुळे राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगड ही तिन्ही राज्य भाजपकडे आली. भविष्यात 350 पेक्षा जास्त खासदार भाजपचेच येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग ,विमानतळ, मेडिकल कॉलेज तसेच विविध महत्वकांक्षी योजना व विविध क्षेत्रात भरीव कार्य केले असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपल्या देशाची प्रतिमा वाढली आहे , असेही ते म्हणाले.