खारेपाटण महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या ९९ व्या जयंती दीना निमित्त दि.२० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता खारेपाटण महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.डी. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
वक्तृत्व स्पर्धेचे हे ९ वे वर्ष असून विजेत्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम ५०००/- रुपये देण्यात येणार आहे.तर द्वितीय पारितोषिक ३०००/- रुपये, तृतीय पारितोषिक २०००/- व उतेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम १०००/- रुपये देण्यात येणार असून वक्तृत्व स्पर्धेकरीता पुढील प्रमाणे विषय ठेवण्यात आले आहेत. १)जागतिक अर्थव्यवस्था आणि भारत २)भारतीय राजकारणातील हरवत चाललेली नैतीकता.३) जगाला पुन्हा एकदा बुद्धाची गरज.४)स्त्रियांना आरक्षणाची हमी.पण,संरक्षण कमी. ४)काळाच्या ओघात शेतकरी संपेल का ? ५) महासत्ताच्या संघर्षात पर्यावरणाचा ह्रास.
खारेपाटण महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांनी केले आहे.तर या स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे…
१) स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थीच सहभाग घेवू शकतात. २)एका महाविद्यालयातील किमान किमान १ व कमाल २ विद्यार्थी स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. ३) स्पर्धा मराठी माध्यमातून घेतली जाईल. ४)स्पर्धकाला विषय सादरीकरणासाठी फक्त ८ मिनिटे + २ मिनिटे वेळ दिला जाईल.५) स्पर्धकाजवळ महाविद्यालयाचे ओळखपत्र व शिफारस पत्र असणे आवश्यक आहे.६)पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार स्पर्धा आयोजन समितीला राहील.७)परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.८)विजेत्या स्पर्धकांच्या भाषणांना महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात प्रसिद्धी दिली जाईल.९) स्पर्धकांनी आपल्या भाषाणाची लेखी प्रत सोबत आणून स्पर्धा संयोजन समितीकडे जमा करावी. १०) स्पर्धेकरीता येणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवास खर्च व निवास खर्च स्वतः करावयाचा आहे.
तरी ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे खारेपाटण महाविद्यालयाचे सहा.प्राध्यापक श्री तानाजी गोदडे – ९९२१५१३८८४, प्रा.वसीम सयद – ८९७५६३७३१७, प्रा.प्रकाश शिंदे – ७५१७०६ ९१३२,प्रा.माधवी पांचाळ – ७५०७३५६६१८ यांचेकडे नोंदवावी. असे आवाहन स्पर्धा समिती प्रमुख प्रा.श्री तानाजी गोदडे यांनी केले आहे.