स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडीत सावळा गोंधळ

नुतन कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त परीणामी ग्राहक त्रस्त

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत आज आठवडा बाजारच्या दिवशी सकाळच्या सत्रात सावळा गोंधळ पहायला मिळाला. काही महिन्यांपासून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने अनेक ग्राहकांना सिम्प्ली सेव्ह क्रेडिट कार्ड देण्यात आली आहेत. संबंधित कार्ड कार्यान्वित करण्यासाठी ग्राहकांना क्रेडिट कार्ड वितरक यांनी बँक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून संबंधित वितरण बँक शाखेत अनुपस्थित आहे. शिवाय संबंधित कर्मचारी कोणत्या कारणास्तव गैरहजर आहे याची बँक व्यवस्थापक व अन्य कर्मचारी यांना देखील खात्रीशीर माहिती नसल्याचे आढळून आले. शिवाय आज सकाळच्या सत्रात बँकेत काही नुतन कर्मचारी उपस्थित होते. त्यांना संबंधित कार्ड विषयी माहिती विचारली असता बँकेत आलेल्या ग्राहकाला समाधान कारक उत्तरे मिळण्याऐवजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडीत उपस्थित असलेले नुतन कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे दिसून पहायला मिळाले. याविषयी जाब विचारला असता आपण ग्राहकाशीच बोलत होतो असे सांगुन सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न नुतन कर्मचाऱ्यांनी केला. एकीकडे विविध योजनांसाठी ग्राहकांना संपर्क साधून बँकत बोलवायचे व बँक शाखेत आल्यावर ग्राहकास पुरेशी माहिती देण्यास व सहकार्य करण्यास असमर्थता दर्शवायची असा प्रकार वैभववाडीत आज पहायला मिळाला. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!