बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन
चौके (अमोल गोसावी) : बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज काळसे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत २८ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान आणि एस. एस. पी. एम. हॉस्पिटल रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे रक्तदान शिबीर घेण्याचे हे सातवे वर्ष आहे.
दरम्यान धामापूर सरपंच सौ. मानसी महेश परब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच रमेश निवतकर, सदस्य प्रशांत गावडे, उद्योजक महेश परब काळसे ग्रामपंचायत सदस्य खुशी राऊळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नितीन सातार्डेकर, सचिव अमोल परब, सामाजिक कार्यकर्ते आबा परब, योगेश राऊळ, किरण राऊळ, उल्हास थवी, एस. एस. पी. एम. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज रक्तपेढी चे डॉ. इब्राहिम, टेक्निशियन मनिष यादव, अक्षता केळकर, अमृता आचरेकर, संतोष जाधव तसेच मंडळाचे कार्यकर्ते सिद्धेश काळसेकर, हर्षद नाईक, स्वप्निल जुवेकर, नितीन राऊळ, रोहित परब, केदार राऊळ, नितीन राऊळ, सिद्धेश जुवेकर, सिद्धेश ठाकूर, हर्ष सातार्डेकर, चैतन्य सातार्डेकर, अक्षय परब आणि रक्तदाते उपस्थित होते.