Category चौके

काळसे येथे महिलांसाठी मोफत अगरबत्ती प्रशिक्षण संपन्न

चौके (प्रतिनिधी) : समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संवेद फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने काळसे येथे महिलांसाठी एक दिवशीय अगरबत्ती प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात प्रशिक्षक रश्मी दाभोलकर यांनी अगरबत्ती निर्मितीच्या विषयीची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत या उद्योगातील व्यावसायिक संधींची महिलांना…

कट्टा येथे राजकोट येथील घटनेचा उबाठा शिवसेनेकडून निषेध

चौके (प्रतिनिधी) : काल मालवण मध्ये शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याने घडलेल्या घटनेचा कट्टा उबाठा शिवसेना शाखेच्या वतीने आज निषेध करण्यात आला. कट्टा येथे उबाठा शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला त्यावेळी उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, , ग्रामपंचायत सदस्य बाबू…

तुटलेल्या विद्युत तारेवर पाय पडल्याने शॉक लागून महिला जागीच मृत्यूमुखी

काळसे बागवाडी येथील दुर्घटना , वीज वितरण विरोधात ग्रामस्थ आक्रमक चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अनिता अंकुश कुडाळकर वय ६५ वर्षे या शेतीकामासाठी शेतात जात असताना घरापासून ५० मीटर अंतरावर मळ्यात…

चौके प्राथमिक शाळा नंबर एक येथे शालेय मुलांचा गुणगौरव

पत्रकार संतोष गावडे यांचा आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम चौके (अमोल गोसावी) : जिल्हा परिषद शाळा चौके नंबर 1 येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक कार्यकर्ते तसेच मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष पत्रकार संतोष गावडे आणि परिवार यांच्याकडून आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ…

स्वामी कृपा मालवण, हर्ष हळदणकर, पिंट्या नार्वेकर ठरले निलेश राणे चषकाचे मानकरी

गणेश बांदेकर, अथर्व पालव, अण्णा सावंत उपविजेते काळसेत बाळराजे मित्रमंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद चौके (अमोल गोसावी) : शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी काळसे सातेरी मंदिर नजीक भव्य दिव्य अशी बाळराजे मित्र मंडळ आयोजित आणि पिंट्या नार्वेकर पुरस्कृत,…

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक अरुण दत्तात्रय परब यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : कुडाळ लक्ष्मीवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक अरुण दत्तात्रय परब वय 78 वर्षे यांचे 14 ऑगस्ट रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलगे , सुना नातवंडे असा परिवार आहे, नेव्ही ऑफिसर…

धामापूर येथे भाजपच्या वतीने वह्या वाटप

चौके (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण , भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार. निलेश राणे यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी धामापूर गावातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या वेळी धामापूर सरपंच मानसी महेश परब. उपसरपंच रमेश…

काळसेत निलेश राणे चषक नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन

तब्बल ४००० नारळ आणि ५५ हजार रोख बक्षीसांची भव्य नारळ लढविणे स्पर्धा उद्योजक पिंट्या नार्वेकर पुरस्कृत आणि बाळराजे मित्र मंडळ यांचे आयोजन चौके (अमोल गोसावी) : बाळराजे मित्र मंडळ आयोजित आणि पिंट्या नार्वेकर पुरस्कृत, निलेश राणे चषक ही एकूण 55…

पेंडुरच्या ७७ विद्यार्थ्यांना मिळाला नवीन गणवेश

माजी विद्यार्थ्यांसह दानशूर व्यक्तींचे दातृत्व चौके (अमोल गोसावी) : ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी मालवण तालुक्यातील पेंडुर माध्यमिक शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले. याला माजी विद्यार्थी, शिक्षकांचे नातेवाईक, दानशूर व्यक्ती, चाकरमान्यांसह ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.…

महसूल पंधरवडा उपक्रमांतर्गत मालवण तालुक्यात कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत 1ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधी मध्ये महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मालवण तालुक्यात ठिकठिकाणी कृषी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे दरम्यान सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी…

error: Content is protected !!