स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर ,शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने स्वराज्य सप्ताह निमित्त कणकवली तालुकास्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.शालेय 3 गटांत ही स्पर्धा विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. स्पर्धा सहभागासाठी प्रसाद राणे मोबा. 9422374127 यांच्याशी संपर्क साधून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर आणि कणकवली शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केले आहे. स्पर्धा पहिली ते चौथी 5 वि ते 7 वि आणि 8 वि ते 10 वि अशा तीन गटात होणार आहे. स्पर्धेसाठी पहिल्या गटाला सिंधुदुर्ग किल्ला किंवा बाल शिवाजी , दुसऱ्या गटासाठी माझा आवडता किल्ला किंवा शिवाजी महाराज व्यक्तिचित्र तर तिसऱ्या गटासाठी शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक प्रसंग, किंवा सिंधुदुर्ग किल्ला बांधणी करतानाच प्रसंग व शिवराय हा विषय असून प्रथम क्रमांक ५०० रु.,
द्वितीय क्रमांक ३०० रु. तृतीय क्रमांक २०० रु उत्तेजनार्थ दोन बक्षिसे २५१ रु दिले जाणार आहे.गट क्रमांक दोन 5 वि ते 7 वि साठी प्रथम क्रमांक १००० रु. द्वितीय क्रमांक ८०० रु. तृतीय क्रमांक ६०० रु. उत्तेजनार्थ दोन २५१ रु प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच गट क्रमांक तिन 8 वि ते 10 वि साठी प्रथम क्रमांक 1500 रु, द्वितीय 1200 रु, तृतीय 1000 रु, उत्तेजनार्थ 251 रु तसेच प्रमाणपत्रव सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!