कुडाळ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी सेवाभावी संस्था (एनजीओ) आघाडी सिंधुदुर्गच्या जिल्हा सहसंयोजक पदी भिकाजी उर्फ बाळा गोविंद मेस्त्री यांची आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री भालचंद्र राऊत यांनी नियुक्ती केली आहे.
बाळा मेस्त्री हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून ग्लोबल व्हिजन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या मेस्त्री यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सर्व प्रकारच्या स्वयंसेवी संस्थानां उत्तम मार्गदर्शन होईल अशी आशा भालचंद्र राऊत यांनी व्यक्त केली.
मेस्त्री यांना भालचंद्र राऊत यांच्या हस्ते कुडाळ येथील भाजपा कार्यालय येथे नियुक्तीपत्र प्रदान आले. याप्रसंगी मंडल अध्यक्ष वेंगुर्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी भाजप कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, नगरसेवक निलेश परब, आबा सावंत, चंद्रशेखर पुनाळेकर आदी उपस्थित होते.