केअर आणि वुई केअरच्या संयुक्त विद्यमाने रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थामधे पायाभूत भुमिका निभावणा-या प्रशिक्षित समाजकार्यकर्त्यांची फौज तयार करणा-या केअर -कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन या संस्थेला यावर्षी २५ वर्षे पुर्ण होताहेत. येत्या शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी केअरच्या रौप्यमहोत्सवा निमित्ताने केअर आणि केअर विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थी संघटना वुई केअर च्या संयुक्त विद्यमाने दादर येथील मामा काणे हाँल, रेल्वे स्टेशन बाहेर, दादर पश्चिम. रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केअर च्या पहिल्या बँचचे विद्यार्थी क्रिस्तोपर जाँन राँड्रिग्ज व बलभीम कुलकर्णी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून केअरचे संस्थापक श्रीनिवास सावंत, अध्यक्ष शरद सावंत, विश्वस्त डाँ. राजेश कापसे , रामचंद्र अडसुळे , संदिप परब , डाँ.दिनू मँथ्यु , भास्कर काकड हे यावेळी उपस्थीत राहणार आहेत. अशी माहिती सचिव महेश घाग व खजिनदार आनंद राजु यांनी दिली आहे.
भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांनुसार समाजातील उपेक्षित घटकांना त्यांचे न्याय्य हक्क आणि माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था संघटना मुंबई महाराष्ट्रासह देशभरात कार्यरत आहेत.
या संस्थाना समाजातील विविध वंचित व विशेष घटकांसोबत पायाभूत कार्य करण्यासाठी प्रशिक्षित मनुबळाची आवश्यकता असते. ही गरज पुर्ण करीत केअर (कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन ) ही प्रशिक्षण संस्था गेली २५ वर्षे समाजकार्य प्रशिक्षित युवक युवतींची फौज घडवीत आली आहे.
ववकेअरच्या समाजकार्य, कौन्सेलिंग सारख्या प्रशिक्षण वर्गातून २५०० हून अधिक युवक युवती आजतागायत प्रशिक्षित झाले असून आज ते विविधद समाजसेवी संस्थामधे महत्वाच्या भुमिकांमधे कार्यरत आहेत. हजारो समाजकार्यकर्त्यांची नवी पिढी घडविण्यात केअरच्या प्रशिक्षक टिममधे श्रीनिवास सावंत, रामचंद्र अडसुळे, संदिप परब, डाँ.श्रीम.दिनु मँथ्यू, प्रविण दामले, अँड.किसनराव चौरे, महेंद्र गमरे, भास्कर काकड इ.ची महत्वाची भुमिका राहिली आहे.