पालकमंत्री रवींद्र चव्हाण – आमदार वैभव नाईक यांची बंद दाराआड चर्चा

कणकवलीतील भेटीमुळे चर्चेला उधाण

कणकवली (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची येथील कणकवली शासकीय विश्रामगृहावर भेट घेतल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. ही भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सारख्या ठिकाणी घेतल्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. देवगड तालुक्यातील एका कार्यक्रमाला जात असताना पालकमंत्री शासकीय विश्रामगृह येथे काहीकाळ थांबले असता याच वेळी आमदार वैभव नाईक हे त्यांना जावून भेटले. या भेटीत काय चर्चा झाली हे कळू शकले नाही मात्र उबाठा सेनेच्या आमदाराने घेतलेली ही भेट म्हणजे नक्की कशासाठी ? बंद दरवाजा मागे नक्की काय चर्चा झाली आमदार वैभव नाईक कोणती भुमिका घेतात या बाबत उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.

error: Content is protected !!