सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असो. कणकवलीचा २८ फेब्रुवारी रोजी स्नेहमेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त, प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा कणकवलीचा वार्षिक स्नेहमेळावा मंगळवार २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. वृंदावन हॉल कलमठ (जानवली पुलानजिक) येथे चंद्रकांत तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त मंडळाचे अध्यक्ष सावळाराम अणावकर, उपाध्यक्ष प्रकाश दळवी, ना.य. सावंत, सुधाकर खानविलकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तरी या स्नेहमेळाव्याला सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका सचिव अनिलकुमार माळवदे यांनी केले आहे.

error: Content is protected !!