वैभववाडीत वातावरण तापले,पर्यायी जागा दिल्याशिवाय स्टॉल हटवणार नाही

नगरपंचायत समोर उभ्या असलेल्या जेसीबी वर स्टॉल धारकांचा ठिय्या

वैभववाडी(प्रतिनिधी): वैभववाडी शहरातील स्टॉल धारकांनी नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचा शब्द दिला होता.त्या प्रमाणे गेल्या गुरुवारी काही स्टॉल धारकांनी स्वतः नगरपंचायत हद्दीतील स्टॉल हटविण्यास सुरवात केली होती. मात्र काही स्टॉल धारकांनी अद्याप देखील स्टॉल न हटवल्याने आज नगरपंचायत प्रशासनाकडून जेसीबी च्या माध्यमातून स्टॉल हटविण्यात येणार होते परंतु सकाळ पासून नगरपंचायत समोर उभ्या असलेल्या जेसीबी वर  स्टॉल धारकांनी जेसीबी वरच आपला ठिय्या मांडला आहे

आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवर पोलिस प्रशासनाने स्टॉल लावण्यास मनाई केली आहे. ती पोलीस प्रशासनाची राखीव जागा आहे त्यामुळे  आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या आम्ही त्वरित स्टॉल हटवतो असे मत काही स्टॉल धारकांचे आहे. तर दुसरीकडे उपोषण करणाऱ्या स्टॉल धारकांनी आपले स्टॉल पहिला हटवावे मग आम्ही आमचे स्टॉल हटवतो असे काही स्टॉल धारकांचे मत आहे. यावरून स्टॉल धारकांमध्ये गट पडल्याचे दिसून येते. 

सकाळ पासूनच नगरपंचायत व स्टॉल धारकांमध्ये  वातावरण तापल्याने पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी जिल्ह्यात जमावबंदी असल्याने स्टॉल धारकांचे समर्थन करणाऱ्या व्यक्ती सोडून बाकी कोणीही परिसरात थांबू नये अशा सूचना दिल्या आहेत. स्टॉल धारकांना नगरपंचायत प्रशासनाने माणूसकीच्या नात्याने स्टॉल हटविण्यास मुदत दिली होती मात्र आता स्टॉल न हटविल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी स्टॉल धारकांना सांगितले आहे.  आता पुढे काय होणार हे सायंकाळ पर्यंत स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!