लोरे नं. २ गावाने ठेवला आदर्श

लोरे नं. २ विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

वैभववाडी (प्रतिनिधी) : लोरे नं. २ गावाने गावाच्या एकतेला साजेल असा निर्णय घेत श्री देव गांगो विकास सेवा संस्था लोरे नं. २ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे. त्यामुळे सर्व पक्षीय नेते आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. कुठल्याही प्रकारे पक्षीय भेदभाव न ठेवता अत्यंत चांगला निर्णय घेवून ज्यांनी या सोसायटीची स्थापना केली आणि गावातील लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न केला ते गावचे ज्येष्ठ नेते कै. आबासाहेब रावराणे यांना सर्व गावाने वाहिलेली ही आदरांजली आहे, अशा शब्दांत गावचे सरपंच विलास नावले यांनी सर्वांचे आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या.

निवडून आलेल्या सदस्यांत सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटामधून प्रकाश धोंडू गोरूले, किशोर भिकाजी घावरे, सुभाष भास्कर कुडतरकर, देऊ धोंडू मांजलकर, सुरेश भिकाजी नाचनेकर, विनोद भगवान परवडे, छोटू गणपत रावराणे, महिला प्रतिनिधी ममता विश्वास पेडणेकर, सुजाता संजय पेडणेकर, इतर मागास प्रवर्गामधून भास्कर पुंडलिक पांचाळ, अनुसूचित जाती प्रवर्गामधून गणेश काशिराम पेडणेकर, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गामधून कृष्णा नारायण गोसावी यांची निवड झाली आहे.

यावेळी माजी सरपंच महेंद्र रावराणे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र रावराणे, नाना रावराणे, दिगंबर रावराणे, छोटू रावराणे, माजी चेअरमन बाळा सुतार, रितेश सुतार, रुपेश पाचकुडे, संजय सुतार, अनिल नराम, देवू मांजलकर यांनी तसेच ग्रामस्थांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याबद्दल सरपंच विलास नावले यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!