सायली परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : आचरे-समर्थनगर येथील रहिवासी व मूळच्या मुणगे-कारिवणेवाडी येथील सायली सुनिल परब 52 यांचे अल्पशा आजाराने बुधवार 22फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचरादरम्यान त्यांचे निधन झाले.भूमिअभिलेख कणकवली कार्यालयाचे सेवानिवृत्त अधिकारी सुनिल परब यांच्या त्या पत्नी होत. भिरवंडे आमनिपाचेवाडी येथे माहेर असलेल्या पूर्वाश्रमीच्या जागृती सखाराम सावंत या पत्रकार तथा भिरवंडे गावचे उपसरपंच नितीन सावंत यांच्या ज्येष्ठ भगिनी होत.त्यांच्यावर गुरुवारी सकाळी मुणगे कारिवणेवाडी येथील स्मशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात. आले .पचश्यात पती,मुलगी,दिर, जावा,पुतणे,पुतण्या असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!