सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातून बाल विकास प्रकल्प योजने अंतर्गत सावंतवाडीत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस ही पदे मानधन तत्वावर भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने तालुका बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कारिवडे, सावरवाड, चराठे, डिंगणे, पाडलोस, आजगाव, सरमळे ,चौकूळ , इन्सुली ,कुणकेरी, शेर्ले,निगुडे, बांदा, वेर्ले, आंबेगाव, माडखोल, तळवडे, निरवडे, मळगाव ,ओरोस ,सोनुर्ली ,गाळेल वाफोली ,तांबोळी ,मडुरा या ग्रामपंचायत क्षेत्रातील ही पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी १३ मार्चपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पंचायत समितीकडून करण्यात आले आहे.