“सखी एक- निरामय जीवन” महिलांसाठी फोंडाघाट मध्ये तारीख 21 एप्रिल रोजी मोफत मेडिकल चेकअप कॅम्प चे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांना कुटुंबाची दिवसभराची कामे करताना, स्वतःकडे लक्ष देण्याची अथवा स्वतःच्या आहार-विहार सांभाळण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे “सखी एक- निरामय जीवन” या उद्देशाने उमंग चाईल्ड ट्रस्ट आणि भारत पेट्रोलियम तर्फे मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केले आहेत.

फोंडाघाट पूर्णाानंद भवन पिंपळवाडी येथे तारीख 21 एप्रिल 24 रोजी भारत पेट्रोलियम आणि उमंग चाईल्ड ट्रस्ट मार्फत पंचक्रोशीतील महिलांसाठी आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये रक्त तपासणी मध्ये सीबीसी, डायबेटीस, व्हिटॅमिन डी 3, तसेच पूर्ण तपासणी, थायरॉईड, ब्रेस्ट कॅन्सर ( मेमोग्राफी ) तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक तपासणी महिलेला हेल्थ व न्यूट्रिशन किट मोफत भेट दिले जाईल..

कॅम्प ला येताना आधार कार्ड झेरॉक्स आणणे आणि तपासणी साठी नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. प्रथम येणाऱ्या 300 महिलांची रक्त तपासणी आणि चिकित्सा केली जाईल. यासाठी दर्शना पेडणेकर 86 91 866 857 मानसी सावंत 84 59 87 83 68 आणि सीमा कदम 93 59 47 4701 यांचेशी संपर्क साधावा आणि नोंदणी करावी. फोंडाघाटसह तारीख 18, कोळोशी, 19 शिरगाव, 20नांदगाव, आणि 22 विलये- राजापूर येथे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!