कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल सुतारवाडी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.दिगंबर धोंडु पांचाळ वय (६५) यांचे गुरुवारी १८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता शिरवल येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
दिगंबर पांचाळ हे उत्कृष्ट पेंटर होते. शिरवल गावचे शिवसेना शाखा प्रमुख पद त्यांनी भुषविले होते .शिरवल गावच्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते.गावच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.ते सार्वजनिक कामात हिरीरीने पुढाकार घेत असत.त्यांच्या जाण्याने शिरवल गावावर शोककळा पसरली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, एक विवाहित मुलगी, जावई, भाऊ, भावजय, पुतणे पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शिरवल येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शिरवल गावातील आणि कणकवली तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.