केंद्रीयमंत्री राणेंनी वाचवले कॅन्सरग्रस्त वृद्धाचे प्राण

राजापूर – सागवे गावातील रज्जाक हसन भाटकर यांचे 6 लाखांचे कॅन्सर ऑपरेशन झाले मोफत

आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली आरिफ बगदादी, जाहिद खान, फेहमीना यांचे अमूल्य सहकार्य

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : लोकसभा निवडणुकीचा धुरळा जोरदार उडत असतानाच महायुती चे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुती चे उमेदवार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या समाजकार्याचा वसा सुरूच ठेवला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचार धुमाळीत नारायण राणे यांनी राजापूर तालुक्यातील सागवे गावातील रज्जाक हसन भाटकर या 74 वर्षीय वृद्धाचे कॅन्सर चे ऑपरेशन मोफत करवून दिले आहे.

आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी , स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिद खान, फेहमीना मॅडम यांनी भाटकर यांच्या कॅन्सर रोगावरील ऑपरेशन साठी अनमोल योगदान दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सागवे गावातील रज्जाक हसन भाटकर हे 74 वर्षीय वृद्ध कॅन्सर ने पीडित रुग्ण होते. त्यांच्यावर ऑपरेशन करणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च होत. मात्र भाटकर यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना हा खर्च पेलवणार नव्हता. देवगड तालुक्यातील गिर्ये येथील जि. प. चे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांना भाटकर यांच्या कुटुंबियांनी सम्पर्क केला. आरिफ बगदादी यांनी तात्काळ भाटकर कुटुंबियांवर ओढवलेला प्रसंग केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्याजवळ कथन केला. केंद्रीयमंत्री राणे यांनी तात्काळ आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार आरिफ बगदादी यांनी मुंबईत राणें च्या स्वाभिमान ट्रस्ट चे आरोग्यविषयक सुविधा पुरविणाऱ्या जाहिदभाई खान आणि फेहमीना खान मॅडम यांच्याशी संपर्क साधला. कॅन्सर बाधित भाटकर व त्यांच्या कुटुंबियांना मुंबईत जाण्यासाठी प्रवासखर्चालाही आरिफ बगदादी यांनी पदरमोड करत सहकार्य केले. कॅन्सर पीडित रज्जाक भाटकर याना मुंबईतील बेठाणी रुग्णालयात 6 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले. भाटकर यांच्यावर पोटाच्या कॅन्सर रोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली . त्यानंतर भाटकर याना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वी करून दिल्याबद्दल सागवे येथील भाटकर कुटुंबियांकडून तसेच सागवे गावातील ग्रामस्थांकडून केंद्रीयमंत्री नारायणराव राणे , आमदार नितेश राणे यांचे तसेच यासाठी सहकार्य करणारे आरिफ बगदादी , स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिदभाई खान यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!