उज्वल भविष्यासाठी दादांच्या पाठीशी राहूया ! पंढरीनाथ मसुरकर यांचे आवाहन

नारायण राणे व्हिजन असलेले नेते

मसुरे (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते असा ज्यांचा उल्लेख केला जातो असे लाडके नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे लोकसभेसाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता कोकणच्या भल्यासाठी सर्वांनी ना नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. पर्यटनातून येथील भागात आर्थिक सुबत्ता येणे आवश्यक असल्याने तसेच ग्रामपंचायत दप्तरी मसुरे ग्रामपंचायत हे नाव पूर्ववत येण्याच्या शासन निर्णयास चालना मिळण्यासाठी सर्वांनी आपला मताच्या माध्यमातून पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे आवाहन मसुरे भंडारी समाज सेवा संघ माजी अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. मसुरे गावाला मोठी धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली आहे. प्रसिद्ध असे आई भराडी देवी मंदिर, सातेरी जलमंदिर, ग्रामदैवत भरतेश्वर मंदिर आणि इतर देवालयांची मांदियाळी या गावात आहे. तसेच पर्यटनासाठी किल्ले भरतगड, कालावल खाडी पात्र, पर्यटकांना खुणावणारी बेटे या गावात असून भगवंतगड किल्ला सुद्धा नजीकच आहे. धार्मिक पर्यटकाना निसर्ग पर्यटनाचा आनंद घेता येणे शक्य आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रोजगाराच्या संधी या भागात निर्माण होणार आहेत. येथील किनारपट्टी वरील अनेक बेरोजगार युवकांना शाश्वत व्यवसाय निर्माण होण्यासाठी पर्यटनास चालना मिळणे आवश्यक आहे. कालावल खाडी पात्रात विविध वॉटर स्पोर्ट, तसेच न्याहरी निवास व्यवस्था आणि मालवणी जेवण आदी सुविधा निर्माण होण्यासाठी राजकीय पाठबळ पाठीशी असणे तितकेच आवश्यक आहे. व्हिजन असलेले नेते ना नारायण राणे असल्याने देशात पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची घोषणा त्यांनी केली होती. समुद्र किनारपट्टी वर बऱ्या पैकी पर्यटन बहरले असताना आता गावा गावात पर्यटनातून आर्थिक समृद्धी येणे आवश्यक आहे. ही समृद्धी आणण्याची ताकद ना नारायण राणे यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. त्यामुळे देशाच्या मंत्रिमंडळात ना नारायण राणे यांना महत्वाचे मंत्रिपद मिळण्यासाठी मोठे मताधिक्य मिळणे आवश्यक आहे. या भागाचा पर्यटनातून विकास साध्य व्हावा यासाठी सर्वांनी ना नारायण राणे यांच्या पाठीशी भरघोस मतांनी उभे राहणे आवश्यक आहे. आपल्या उद्याच्या उज्वल भविष्यासाठी येत्या ७ मे रोजी आपला हक्काचा खासदार लोकसभेत पाठविण्याची संधी सर्वाना लाभणार आहे. लाखोंच्या मताधिक्याने विजयाचा गुलाल उधळण्यासाठी ना नारायण राणे यांच्या पाठीशी राहूया असे आवाहन पंढरीनाथ मसुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!