दगदगीच्या जीवनातून, निवृत्तीनंतर एकत्र येण्याने मिळालेली ऊर्जा आणि त्यासाठी विश्वासाचे साधन म्हणजेच मैत्री !

फोंडाघाट हायस्कूल सन १९८७ च्या वर्गाचा स्नेहोत्सव, ऐतिहासिक पावनखिंडीच्या परिसरात संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील निरागस- उत्कट आणि आनंददायी सुवर्णकाळ ! त्या काळातील दैनंदिन जीवन,दंगामस्ती, शिक्षण, शिस्त, प्रेम आणि धुसमुसळेपणाच्या आठवणी संस्कारक्षम तर असतातच,परंतु जीवनाला आकार देणाऱ्यासुद्धा ! प्राथमिक-माध्यमिक शालेय शिक्षण बहरल्यानंतर, प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या वाटांनी, कॉलेज, नोकरी, व्यवसायाने विभक्त होतात. वेळ नसतो. करियर घडविण्याच्या अथक परिश्रमातून, प्रत्येक जण जीवनातील चढ-उतार, सुख-दुःख, कौटुंबिक जबाबदारी, या अनुभवातून मोठा होत असतो …

आणि मग फुर्सत मिळते,ती उतार वयाची जाणीव झाल्यानंतर— निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य— जबाबदाऱ्या कमी झाल्यानंतर— त्यामुळे फोंडाघाट हायस्कूल सन १९८७ मध्ये पास झालेल्या मुला- मुलींनी गेली दहा वर्ष एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले. चालू वर्षी संयोजक मित्रवर्य चंदू कुलकर्णी यांनी आंबाघाट-शाहु वाडी- ज्योतिबा- पावनखिंड अशा निसर्गरम्य, ऐतिहासिक शौर्याने परिपूर्ण ठिकाणी संपन्न झाला. शालेय जीवनातील तीच विश्वासार्हता-माया- खट्याळपणा- स्नेह प्रत्येकाच्या वावरातून जाणवत होता. त्या वर्गातील पन्नाशीला पोहोचलेले आणि नैसर्गिक पण प्रकृतीने बदललेले मित्र-मैत्रिणी नी, गप्पा- टप्पा, मनोरंजन, आठवणी विनोद, नाच- गाणी, विविध गुणदर्शनचा आनंद,त्यात ज्योतिबा दर्शन आणि शौर्याचे प्रतीक पावनखिंडीचा इतिहास सर्वांना वेगळ्याच विश्वात पुढील आयुष्यासाठी ऊर्जा देणारा ठरला…

दोन दिवसाच्या स्नेह- मिलनाला सर्वांनीच आपापल्या परीने सहकार्य केले. यामध्ये ठीक- ठिकाणाहून आलेले संतोष सावंत, राजन चीके, चंदू कुलकर्णी, विजय गोवेकर, पिंटू पारकर, दादा सुर्वे,प्रसाद सातवसे, मीना पेडणेकर, संगीता पावसकर, बेबीताई शेटे जागृती सावंत, राजश्री पवार, पपी तायशेटे, माधवी काळगे, इत्यादी विद्यार्थिनी- विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. पुढील वर्षी पुन्हा एकदा एकत्र येऊन स्नेहोत्सव साजरा करण्याच्या आणाभाका घेत प्रत्येकाने निरोप घेतला

error: Content is protected !!