संजय राऊत सह काँग्रेसच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा
रोहित पवारना कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड द्यावा
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पाकिस्तान च्या बिलावल बुट्टो ची भाषा संजय राजाराम राऊत करत आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीला मत म्हणजे पाकिस्तान ला मत आहे. पाकिस्तान ची भलावण करणाऱ्या संजय राजाराम राऊत सह इंडिया काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. संजय राऊत हा महाराष्ट्रातील बिलावल बुट्टो आहे असा घणाघात भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला. आमदार रोहित पवार बारामती च्या सभेत रडले तो धागा पकडून फिल्मफेअर चे कॉमेडी अवॉर्ड अजून शिल्लक आहे. कॉमेडी अवॉर्ड रोहित पवार ला देण्याची शिफारस करतो असे सांगत नितेश राणे यांनी रोहित पवार यांची खिल्ली उडवली. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की भाजपाच्या काल च्या जाहिरातीवरून चोर की दाल मे तिनका असलेल्या मुस्लिम लीग ची बी टीम आणि पाकिस्तान चे एजंट काँग्रेस ला हिरव्या मिरच्या झोंबल्या. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी कर्नाटक मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर पाकिस्तान झिंदाबाद म्हणत पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले. स्वतःला नेतेमंडळी म्हणणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून पाकिस्तान मध्ये बसलेल्या आपल्या बापाला खुश करण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली जात आहे. संजय राजाराम राऊत हा हिंदू राहिलेला नाही. भांडुप मध्ये बसून पाकिस्तानच्या बिलावल बुट्टो ची भाषा करत आहे. संजय राऊत वर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. संजय राऊत हा महाराष्ट्रातील बिलावल बुट्टो असल्याची टीका नितेश यांनी केली. त्यामुळे मतदारांनी आपले मत देताना पाकिस्तानात फटाके फुटता नये याची काळजी घ्यावी असे सांगतानाच भाजपला मतदान करण्याचे आवाहनही नितेश राणे यांनी केले.