आडवा ये..तुला गाडूनच पुढे जातो

उद्धव ठाकरेंचा राणेंवर घणाघात

मोदी शहांवर ठाकरी तोफ कोसळली

इंडिया आघाडी सरकार आल्यावर जीएसटी करप्रणाली बदलणार

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : बेअक्कली जनता पार्टी चे नेते अमित शहा नकली शिवसेना म्हणतात. बेअक्कली जनता पार्टी चे सरदार मला हिंदुत्वावर आव्हान देतात. मी म्हणतो हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नांवर बोला असे आव्हान ठाकरी भाषेत उद्धव ठाकरे यांनी दिले. बाळासाहेब काय म्हणता ? बाळासाहेब तुमच्या वर्गात होते काय ? हिंदुहृदयसम्राट म्हणा असे सडेतोड बोल उद्धव यांनी शहा यांना कणकवलीतल्याप्रचार सभेत सुनावले. केंद्रीयमंत्री महायुती चे उमेदवार नारायण राणेंवर ही भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव यांनी ठाकरी भाषेत आसूड ओढला. म्हणे येऊन दाखव, बघ आलोय, म्हणे आडवा येईन, येऊन तर बघ गाडून पुढे जाईन असे ठाकरी शब्द सुनावले. मला सावरकरांवर बोलायला सांगता मग अमितजी शामप्रसाद मुखर्जी बद्दल बोला. नारायण राणेंना बाळासाहेबांनी गेट आउट म्हटले होते.2005 साली सिंधुदुर्गात राणेनी दहशत पसरवली होती. राजकीय हत्यांची सिंधुदुर्गात मालिका सुरू होती. या हत्येचा शोध केंद्रीयमंत्री म्हणून शहांनी लावावा.तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला ते दिसणार नाही. मोदी शहा घराणेशाही नको म्हणतात.मी अभिमानाने सांगतो ठाकरेंची घराणेशाही आहे.मोदी शहा तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही माझ्या वडिलांचे नाव न लावता स्वतःच्या वडिलांचे नाव लावून जनतेसमोर या.मोदी शहा हे दोन्ही सुरतवाले महाराष्ट्र लुटत आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर हे लुटलेले वैभव मी पुन्हा आणेन.जो आकस तुम्ही महाराष्ट्रा ला दाखवताय त्याचे उट्टे काढणार. मोदींनी नेव्ही डे ला येऊन कोकण विकासाची घोषणा तर केली नाही उलट इथला पाणबुडी प्रकल्प गुजरात ला नेला. सगळे चांगले उद्योग गुजरातला नेताय. गुजरातला रांगोळी आणि महाराष्ट्र ला राख देताय. मी रिफायनरी होऊ देणार नाही हे जगजाहीर सांगतो, तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सांगा रिफायनरी नको म्हणून. कोरोनाची खिचडी उद्धव ने खाल्ल्याचा आरोप करताय.गुजरात उत्तरप्रदेश मध्ये सामूहिक चिता पेटवल्या. उत्तरप्रदेश मध्ये गंगेत प्रेते वाहत होती.महाराष्ट्राने कोरोनाचा यशस्वी लढा दिला. पीएम किसान मधून वर्षाला 6 हजार देतात पण आमच्या खत, बी बियानावर कीटकनाशके, औजारेवर जीएसटी लावून दसपट लुटतात. जीएसटी ची कर प्रणाली आम्ही बदलणार आहोत.चंदा दो धंदा लो ही भाजपाची नीती. ते इलेकंट्रोल बॉण्ड मधून देशाने पाहिले. चिपी विमानतळाचे मी उदघाटन केले.आज त्याची अवस्था बिकट.मोदींनी केवळ कोपराला गुळ लावला. देशात इंडियाचे आघाडी सरकार आल्यास 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत. राणेंच्या खाजगी मेडिकल कॉलेजला मी मुख्यमंत्री असतना परवानगी दिली. शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात सुरू केल्याचा मला अभिमान आहे.स्वतःच्या मेडिकल कॉलेज चा धंदा व्हावा म्हणून शासकीय कार्डियाक कॅथ लॅब सोलापूर ला पाठवली. 2 कोटी नोकऱ्या देणार होता .त्याचे काय झाले ? भ्रष्टाचार करा आणि भाजपात या ही मोदी गॅरंटी देशात सुरू आहे.शुरा मी वंदिले ही महाराष्ट्राची परंपरा पण सध्या चोरा मी वंदिले ही भाजपाची ओळख झालीय. 4 जून ला 300 पेक्षा जास्त जागा घेऊन इंडिया आघाडीचे सरकार देशात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!