कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यावासीयांना लुबाडून, फसवणूक केलेल्या नारायण राणेंचे कमळ करपू लागले आहे. आजवर केवळ स्वतःच्या मालकीचे राणेंनी उद्योग मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज उभारून व्यवसाय केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग ला शासकीय मेडिकल कॉलेज दिले.शासकीय कार्डियक कॅथलॅब सुद्धा दिली.मात्र स्वतःच्या मेडिकल कॉलेजची कार्डियक कॅथ लॅब चालावी म्हणून राणेंनी हि कॅथलॅब सोलापूरला पाठवल्याचा आरोप इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला.टाटा एअर बस सारखे महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला नेलात. मग निसर्गाचा नाश करणारा रिफायनरी प्रकल्प गुजरात ला का नेला नाही ? असा रोकडा सवाल राऊत यांनी भाजपला केला. पालघर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिडको कायदा आणून स्थानिकांच्या जमिनी लुटायचे कारस्थान महायुती सरकारने केले. हे कारस्थान आम्ही पाडून टाकले.भाजपा चे आमदार या सिडको कायद्याच्या बाजूने होते. धनुष्यबाण जरी निवडणूकित विरोधकांनी पुसला असला तरी भवानी मातेने दिलेली मशाल निशाणी विरोधकांना पळता भुई थोडी करेल असेही राऊत म्हणाले.
सिडको कायदा आणून जनतेच्या जमिनी लाटण्याचा महायुती सरकारचं कारस्थान











