रस्त्याकडेची आग विजविण्यात यश; मात्र अजूनही आगीचा भडका होण्याची शक्यता
सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील शहरातील मोर डोंगरी परिसरातील जंगलाला आज दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. भर दुपारी लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले रस्त्यालगत घरे असल्याने आणि जंगलही रस्त्याला लागून असल्याने प्रसंगावधान दाखवून तेथील नागरिकांनी सावंतवाडी नगरपालिकेला संपर्क करून बंब मागविला. तात्काळ घटनास्थळी बंब दाखल होत ही आग विझवण्यात आली. मात्र, जंगल विस्तीर्ण असल्याने केवळ रस्त्याबाजूची आग विजविण्यात यश आले.
जंगलात अजूनही आग धुमसत असल्याने या आगीचा भडका होण्याची शक्यता आहे. मात्र ही आग कशामुळे लागली, हे मात्र अजून समजू शकले नाही.