साद फाउंडेशन, लायन्स आय हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : साद फाउंडेशन सिंधुदुर्ग व लायन्स आय हॉस्पिटल, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जांभवडे येथील मोफत नेत्रतपासणी शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला. जांभवडे पंचक्रोशीतील लोकांनी या सेवेचा लाभ घेतला.
साद फाउंडेशन सिंधुदुर्ग व लायन्स आय हॉस्पिटल, कणकवली यांच्या वतीने डॉ.प्रशांत मडव हॉस्पिटल, जांभवडे येथे गुरूवार 2 मार्च रोजी सकाळच्या सत्रात मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराचे उद्धाटन जांभवडे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित मडव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सिद्धार्थ तांबे, ऋषिकेश कोरडे, डॉ.प्रशांत मडव, साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक, वन अधिकारी मधुकर मडव, वकील विशाल मडव, ग्रामपंचायत सदस्य उदय मडव, नमिता मडव, दीपिका वंजारे(माया), तन्वी पवार(दया),लतिका नाईक(छाया) नंदू मडव, सदानंद तेजम, उपसरपंच पावसकर, लक्ष्मण मडव आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिराला मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थित राहून डोळ्यांची तपासणी करून घेतली. माफक दरात लोकांना चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. तपासणी केलेल्यापैकी १२ रुग्णांना मोतीबिंदू आढळून आले.त्यांची माफक दरात लायन्स आय हॉस्पिटल,कणकवली येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांचा तसेच भाई मडव यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. भाई मडव यांच्या सोबत काम केलेल्या माजी ग्रामसेवकांचाही शाल व श्रीफळ,सन्मानचिन्ह व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. साद फाउंडेशन तर्फे भाई मडव यांना सामाजिक कार्याबद्दल मानपत्र प्रदान करण्यात आले. साद फाउंडेशनचे वर्षा तळेकर, सचिन कोर्लेकर तसेच सौ.तिलोत्तमा मडव यांच्यासह मडक कुटूंबिय, नातेवाईक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रतिक्षा मडव या पैठणीच्या मानकरी ठरल्या.