कणकवली येथील स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद
कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अम्यॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तरीय कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात झाली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठीच्या जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेचे उदघाट्न विद्यामंदिर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वणवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली एसटी आगार व्यवस्थापक संदीप पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी मुळे उपस्थित होते. यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुळकर्णी, कणकवली तालुका अम्यॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे, नितीन तावडे, सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमीच्या सचिव जयश्री कसालकर, मंदार परब, ओंकार सावंत, सचिन टेंबवलकर, अविराज खांडेकर, ऍड. अक्षय कुलकर्णी, तसेच स्पर्धा पंच म्हणून स्नेहा पाटील, हुमेरा मन्सूरी, जान्हवी बाक्रे, लाजरी वातकर, भाग्यश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
कॅडेट मुली उंची १४४ सेंटीमीटर खालील प्रथम -श्रावणी सावंत (देवगड), १४८ सेंटीमीटर खालील प्रथम दुर्वा सरूडकर (कणकवली), द्वितीय अस्मि राऊळ ( मास्टर स्पोर्ट्स,अकादमी कणकवली ), १५२ सेंटीमीटर खालील प्रथम दीपश्री तेंडुलकर (सिंधुरत्न स्पोर्ट्स अकादमी ), द्वितीय पदमश्री नर (मास्टर स्पोर्ट्स अकादमी ), तृतीय लावण्या मोदी (मास्टर स्पोर्ट्स अकादमी), १५६ सेंटीमीटर खालील प्रथम संयुक्ताराजे आबदार ( सिंधुरत्न स्पोर्ट्स), द्वितीय प्रांजल मूळे (सिंधुरत्न स्पोर्ट्स), तृतीय रुचा चव्हाण( सिंधुरत्न स्पोर्ट्स), काव्या राऊत (कुडाळ तालुका ), १६४ सेंटीमीटर खालील प्रथम देवश्री कणसे (सिंधुरत्न स्पोर्ट्स), द्वितीय मंजिरी सावंत (मास्टर स्पोर्ट्स ),तृतीय आर्या पडते (कणकवली तालुका). १७० सेंटीमीटर खालील प्रथम स्वीजल डिसोजा (सिंधुरत्न स्पोर्ट्स), द्वितीय गार्गी काजरेकर (कणकवली तालुका ) तृतीय गीत पवार (कणकवली तालुका), संचिता रावराणे (मास्टर स्पोर्ट्स). कॅडेट मुले- १४७ सेंटीमीटर खालील प्रथम प्रेसित कामत (कणकवली तालुका), द्वितीय साईराज पाटील (सिंधुरत्न स्पोर्ट्स), तृतीय तेज बोडके (कणकवली तालुका).१५२ सेंटीमीटर खालील प्रथम ओंकार पाटील (कणकवली तालुका), द्वितीय सविनय जाधव (कणकवली तालुका),तृतीय वरद दराडे, आकाश कोकम (दोन्ही देवगड ), १५६ सेंटीमीटर खालील प्रथम रुद्र सावंत (कणकवली तालुका), द्वितीय जैत्र पटेल (सिंधुरत्न स्पोर्ट्स), तृतीय दुर्वेश सावंत (देवगड), कुणाल गवंडळकर (सिंधुरत्न स्पोर्ट्स ), १६४ सेंटीमीटर खालील प्रथम श्रेयस नार्वेकर (कणकवली तालुका). ज्युनिअर मुली – ४२ किलो खालील प्रथम – संध्या गवंडळकर (सिंधुरत्न स्पोर्ट्स), ४४ किलोखालील प्रथम दुर्वा गावडे (कणकवली तालुका). ४६ किलो खालील प्रथम हेमांगी गुरव (मास्टर स्पोर्ट्स ), ४९ किलो खालील प्रथम – सोनिया ढेकणे (कणकवली तालुका). ५२ किलो खालील प्रथम वेदिका वातकर (कणकवली तालुका), ५५ किलो खालील प्रथम प्रज्योती जाधव (कणकवली तालुका). द्वितीय कमल बांदेकर (कुडाळ तालुका).
५९ किलो खालील प्रथम ऋतुजा शिरवलकर (कणकवली तालुका). ६८ किलोवरील प्रथम पलक पवार (मास्टर स्पोर्ट्स). ज्युनिअर मुले- ४५ किलोखालील प्रथम अथर्व तेली (कणकवली तालुका), द्वितीय देवाशिष नर (मास्टर स्पोर्ट्स). ४८ किलो खालील प्रथम प्रणव कुडाळकर (कणकवली तालुका). ५८ किलो खालील प्रथम वेदांत धनवटे (कणकवली तालुका) यांनी यश मिळविले.