सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली विधानसभा निवडणुकीतील महायुती चे भाजपा चे उमेदवार नितेश नारायण राणे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनांचे बॅनर विधानसभा निवडणुक निकाला आधीच राणेंच्या मूळ गावी वरवडे सह कणकवली विधानसभा मतदारसंघात झळकले आहेत. दोन टर्म आमदार राहिलेले नितेश राणे यांनी आपल्या आमदारकी च्या हॅट्ट्रिक साठी तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी उद्या 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.कणकवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. अधिकृत निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.मात्र स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडेचे अचित कदम, सुभाष मालंडकर यांच्यासह अन्य भाजपा कार्यकर्त्यानी तत्पूर्वीच निकालाच्या आदल्या दिवशीच 22 नोव्हेंबर रोजी नितेश राणे यांच्या विजयी हॅट्ट्रिक साठी अभिनंदन अशा आशयाचे बॅनर नितेश राणे यांच्या मूळ गावी वरवडे सह सिंधुदुर्गात लावले आहेत. कणकवली विधानसभा निवडणुकीत महायुती कडून भाजपचे उमेदवार नितेश राणे आणि महाविकास आघाडी च्या शिवसेना उबाठा चे उमेदवार संदेश पारकर यांच्यातच प्रामुख्याने महत्वाची दुरंगी लढत झाली आहे. या लढतीचा निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. मात्र तत्पूर्वीच आदल्या दिवशी सायंकाळी नितेश राणे यांच्या आमदारकी च्या विजयी हॅट्ट्रिक बद्दल स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे यांच्याकडून अभिनंदनाचे बॅनर त्यांच्या मूळ गावी वरवडे सह कणकवली विधानसभा मतदारसंघात झळकले आहेत.