सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते – आमदार वैभव नाईक

समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या – संदेश पारकर

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा स्मृतिदिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. त्यांना अपेक्षित असलेले काम आपण सर्वांनी केले पाहिजे.भिसे कुटुंबीय आणि सत्यविजय भिसे मित्रमंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा स्मृतिदिन साजरा करीत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा आज २२ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच वारकरी संप्रदायातील ५० वारकऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, कै. सत्यविजय भिसे यांचा राजकारण आणि समाजकारणात असलेला नावलौकीक काही अपप्रवृत्तींना मान्य नसल्याने त्या अपप्रवृत्तीने कै. सत्यविजय भिसे यांची हत्या केली. त्या अपप्रवृत्तीला नियतीने धडा शिकवला. आज सत्यविजय भिसे जिवंत असते तर जिल्ह्याच्या राजकारणात अग्रस्थानी असले असते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा भिसे कुटूंबिय आणि मित्रमंडळ जपत आहे. तरुणपिढीने देखील त्यांचा समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे आहे. असे सांगितले.

यावेळी माजी जि.प.सदस्य बाळा भिसे, शंकर पार्सेकर, दिनेश नाडकर्णी, रंजन चिके, शिवडाव सरपंच नितीश भिसे, उपसरपंच सायली तेली, विलास गावकर, संजय पारकर,सचिन आचरेकर , शिरवल सोसायटीचे चेअरमन रविकांत सावंत, शिवसेना कळसुली विभाग प्रमुख चंदु परब,शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे, वनिता जाधव, कै. सत्यविजय भिसे मित्र मंडळाचे अध्यक्ष सत्यवान जाधव, रवी राणे, लवू वाळके, लवू पवार, मधुकर चव्हाण, शिवडाव तंटामुक्ती अध्यक्ष बंडू लाड, सत्यविजय जाधव, भारती देसाई, वैशाली पाटील, श्रीकांत तेली, नितीन हरमलकर, नितिन गावकर, गणेश शिवडावकर, सुनील हरमलकर, गणंजय तेली, निकेतन भिसे, दीपक कोरगावकर, महेश शिरसाट, संतोष मुरकर, बाबू परब, प्रेमानंद कोरगावकर, प्रमोद नानचे, नंदू परब, संतोष दळवी, गणेश म्हसकर, कृष्णा चाळके, संदीप शिरसाट, काशिनाथ गावकर सत्यविजय भिसे प्रेमी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!