कोल्हापूर (प्रतिनिधी) : विशाळगडावरील दंगल ही राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस यांच्या सत्तेच्या राजकारणासाठी केलेला हा पूर्वनियोजित कट असून या दंगलीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने पितळी गणपती मंदिर ते पोलीस महानिरीक्षक कार्यालयपर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपाधीक्षक शशिराज पाटोळे यांची भेट घेतली. यावेळी मित्र मंडळाच्यावतीने विशाळगड येथील घटनेला जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी हे जबाबदार असून त्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
यावेळी ठाकरे गटाचे उपगट नेते संजय पवार, ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख विजय देवणे , जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे,संजय चौगले, माजी आमदार सुजित मिणचेकर,उल्हास पाटील शहरप्रमुख रविकिरण इंगवले,हर्षल सुर्वे, वैभव उगळे ,संभाजी भोकरे,अवधूत साळोखे, पोपट दांगट,संदीप दबडे,सागर साळोखे,हर्षल पाटील ,प्रतिज्ञा उतुरे, स्मिता सावंत, पूनम फडतरे, प्रेरणा बाकले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.