वेंगुर्लेत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप शिबिरात कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद

भाजपा कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांचा यशस्वी पाठपुरावा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२००० बांधकाम कामगारांना त्यांच्या तालुक्यात गृहउपयोगी भांडी संचाचा लाभ मिळणार – भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनाकडून वेंगुर्ले तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या संसारासाठी हातभार म्हणून गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ मा. नगराध्यक्ष राजन गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस, कामगार आघाडी सावंतवाडी विधानसभा प्रमुख सत्यम सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी, किरण कुबल, विनोद सावंत, नाना राऊळ इत्यादी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिवीत नोंदणी असलेल्या ५१७० एवढ्या बांधकाम कामगारांना लोकसभा निवडणुकीपुर्वी गृहपयोगी ३० भांड्यांचा संच भाजपा कामगार आघाडीच्या मागणीनुसार व पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार कामगारांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून तालुका स्तरावर वाटप करण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात आदर्श आचारसंहितेच्या कारणास्तव भांडी वाटप बंद करण्यात आले होते. याबाबत भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत व जिल्हाध्यक्ष अशोक राणे व पदाधिकाऱ्यांनी सहायक कामगार आयुक्त तथा सरकारी कामगार अधिकारी संदेश आयरे यांच्याशी संपर्क साधून कामगारांना केले जाणारे भांडी संच वाटप जिल्हास्तरावर न करता कामगारांच्या सोयीच्या दृष्टीने तालुकास्तरावर करण्याची मागणी केली होती.

लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांच्या हितासाठी व सोयीसाठी प्रत्येक तालुक्यात कामगार सेवा सुविधा केंद्र शासन सुरु करणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले. तसेच बांधकाम कामगारांचे ऑफलाईन फाॅर्म तात्काळ मंजूर होण्यासाठी खासदार नारायणराव राणे साहेब प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ६४३२ बांधकाम कामगारांना याचा फायदा मिळणार असल्याचे सांगीतले. या शिबीरात जवळजवळ ४०० बांधकाम कामगार उस्फूर्त पणे सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!