वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील काजरमुळी रस्त्या नजीक लागून असलेल्या सावंत यांच्या घराशेजारी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. हे काम योग्यरीत्या होत नाही. कामाचा दर्जा नसल्याबाबत तुळस ग्राम पंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. सरपंच, सदस्य यांनी पाहणी केली, अंदाज पत्रकाची मागणी केली. तरीही बांधकाम विभागाचे सबंधित अधिकारी दखल घेत नाहीत. त्यामुळे करण्यात येणारे काम पुढील १५ वर्षे सुस्थितीत राहील, याची हमी १२ ऑगस्ट पर्यंत लेखी स्वरूपात आपल्याला मिळावी. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तुळस ग्राम पंचायतीचे सहा सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना नारायण कुंभार, जयवंत तुळसकर, रमाकांत ठुबरे, मयुरी बरागडे, रतन कबरे, स्वाती सावंत यांनी दिले आहे.
…अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तुळस ग्राम पंचायतीचे सहा सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार












