चिपी विमानतळावरील जंगली श्वापदांचा वावर ; वन अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग विमानतळ -चिपी तालुका वेंगुर्ला येथे दिनांक ०३ जुलै २०२४ रोजी चिपी विमानतळ प्राधिकरण, वनविभाग सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधुदुर्ग विमानतळ” कार्यरत फिल्ड स्टाफ यांना वन्यप्राणी यांची ओळख, त्यांचा अधिवास, याबाबत आयोजित चर्चासत्रात मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक नागेश दप्तरदार, मानद वन्यजीव रक्षक, वनविभाग सावंतवाडी, संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल कुडाळ, विमानतळ व्यवस्थापक कुलदीप सिंग, सावळा कांबळे, वनपाल मठ, सुर्यकांत सावंत, वनरक्षक मठ, विष्णू नरळे, वनरक्षक तुळस उपस्थित होते.

कुलदीप सिंग, व्यवस्थापक यानी मान्यवराचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तदनंतर मनु श्रीवास्तव यानी “सिंधुदुर्ग विमानतळ” परिसरात आढळणाऱ्या पक्षी, प्राणी व सरपटणारे प्राणी यांची माहिती देवून प्रत्येक महिनाप्रमाणे डेटा सादर केला.

तदनंतर नागेश दप्तरदार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळनाऱ्या पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी यांची चित्रफित दाखवून उपस्थित फिल्ड कर्मचारी अधिकारी यांना माहिती दिली. तदनंतर विमानतळ परिसरात आढळणारे कोल्हा, माकड, सरपटणारे प्राणी यांचा अधिवास, त्यांचे अन्नसाखळीतील महत्व विषद केले. त्याचबरोबर सदर प्राण्याकडून विमानतळ धावपट्टीवर येण्यापासून रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सांगितल्या.

संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी वन्यप्राणी यांना कायदाद्वारे असलेले संरक्षण व वन्य प्राणी- मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग करत असलेल्या उपाययोजना बाबत माहिती देवून कार्यरत रेस्कू पथकामार्फत होत असलेल्या रेस्कू ऑपरेशन बाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!