मुंबई विद्द्यापीठाच्या पदवी परीक्षेत दळवी महाविद्यालयाचे घवघवीत यश

तळेरे (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यात मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादित केले आहे. दळवी महाविद्यालयाने यावर्षीही गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी महाविद्यालयीन निकालामध्ये विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. यात बीएमएस विभाग 100 टक्के निकाल, अश्विनी माने 74.47 टक्के मिळवून प्रथम. बि.कॉम विभाग 100 टक्के निकाल, शितल कांजीर 67.58 टक्के मिळवून प्रथम. बीएस्सी-आयटी विभाग 93.33 टक्के निकाल, अल्मिरा शिरगावकर 77.03 टक्के मिळवून प्रथम. बीबीआय विभाग 85.71 टक्के निकाल, अनुष्का कदम 79.37 टक्के मिळवून प्रथम. बीएएफ विभागाचा 73.91 टक्के निकाल, अक्षता पाताडे 80.86 टक्के मिळवून प्रथम. बीए (एमएमसी) विभाग 40 टक्के निकाल निमीश पटेकर 62.26 टक्के मिळवून प्रथम. बीए विभागाचा 71.42 टक्के निकाल, दिनेश माने 63.61 टक्के मिळवून प्रथम. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्र.कुलगुरू,कुलसचिव, दळवी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक, सिंधुदुर्ग उपकेंद्र परिसराचे प्र.संचालक व दळवी महाविद्यालयाचे समन्वयक तसेच शिक्षक व कर्मचारी वर्गांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!