वैभववाडी बस स्थानक काँक्रिटीकरण व प्रवासी शेड बांधकामाला युद्धपातळीवर सुरुवात
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बसस्थानक काँक्रिटीकरण कामाला व प्रवासी शेड बांधकामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. सुशेगाद असलेले राज्य परिवहन मंडळ सिंधुदुर्ग विभाग आमदार नितेश राणे यांच्या बैठकीनंतर खडबडून जागे झाले आहे. कामाला सुरुवात झाल्याने लवकरच हे बस स्थानक सुसज्ज होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी आमदार नितेश राणे यांनी बसस्थानकाला भेट दिली. प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या व प्रलंबित प्रश्न याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सदर कामे तात्काळ चालू करा, अशा सूचना विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांना केल्या. त्यांच्या सूचनेनंतर एसटी प्रशासन एक्शन मोडवर आले आहे. काँक्रिटीकरण करणे कामाला सुरुवात झाली आहे. तसेच प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था बांधण्यात येत आहे. प्रवाशांच्या विविध मागण्या संदर्भात प्रमोद रावराणे व भाजपा पदाधिकारी यांनी आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते.