राजकोट येथील घटनेचा निषेध व्यक्त
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूड पुतळ्याला दुग्धभिषेक करण्यात करीत मालवण राजकोट येथील घटनेचा निषेध करण्यात आला. शिवरायांना दुग्ध अभिषेक करुन सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, लोरे सरपंच विलास नावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिव्या पाचकुडे, माजी पंचायत समिती सभापती राजू रावराणे, लोरे माजी सरपंच महेंद्र रावराणे, उपसरपंच रुपेश पाचकुडे, माजी सरपंच नाना रावराणे, सुरेंद्र रावराणे, दिगंबर रावराणे, केदार नावले, प्रतीक मोरे,संदेश मांजलकर, विश्वजीत रावराणे, सत्यजित रावराणे,राजेश डोंगरे,सूरज झिमाळ,सुयश रावराणे ,रोहन रावराणे.यांच्या सह मोठ्या प्रमाणात युवासेनेचा युवा वर्ग व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वतःच्या राजकीय फायद्याच्या दृष्टीने नेव्ही दिनाचे निमित्त साधून सत्ताधारी पक्षाने जो मालवण येथील राजकोट वर इव्हेंट करुन मोठ्या तोऱ्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला होता तो काल निकृष्ट दर्जा मुळे पडला आणि अनेक शिवप्रेमी मंडळींच्या रोषाचा उद्रेक झाला. खर तर अशी घटना घडणे म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान होय. सरकार आणि सार्वजनिक बांधकाम यांचं अपयश होय. आणि हे अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी जबाबदारी झिडकारून नेव्ही कडे, निसर्गाकडे बोट दाखवत आहेत. असा आरोप यावेळी रावराणे यांनी केला.