वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 येथील रिद्धी रितेश सुतार यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार सिंधुदुर्ग अप्पर जिल्हाधिकारी यांनी रिद्धी सुतार यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. लोरे नं 2 चे ग्रामपंचायत सदस्य, भाजपाचे शक्तिकेंद्रप्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा सुतार शिल्पकार समाज जिल्हाउपाध्यक्ष रितेश सुतार यांच्या त्या पत्नी आहेत.रिद्धी सुतार यांच्या या निवडीमुळे लोरे नं 2 तसेच परिसरातील जनतेची सुविधा झाली असून याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.