बई एसीबी चे डीवायएसपी संतोष बर्गे यांची सुदान देशात पोलीस सल्लागार पदी निवड

देवगड (प्रतिनिधी) : मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्रामधील पोलीस उपअधिक्षक सुदान देशात संतोष धनसिंग बर्गे यांची संयुक्त राष्ट्र संघामध्ये पोलीस सल्लागार पदी म्हणून भारत सरकारतर्फे एक वर्षा करीता सुदान देशामध्ये नेमणूक करण्यात आली असून सुदान देशामध्ये त्यांनी अनेक गुन्हयामधील तेथील पोलिसांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करुन गुन्हे कमी होण्यासाठी तेथील जनतेला मार्गदर्शन करुन महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचाविण्याचे काम करीत आहेत.

महाराष्ट्र लाचलूचपत प्रतिबंधक विभागामध्ये संतोष धनसिंग बर्गे हे गेले एक वर्षापुर्वी पोलीस उपअधिक्षक म्हणून काम करीत होते. यापुर्वी त्यांनी रायगड,विजयदुर्ग (सिंधुदुर्ग),ठाणे,पुणे अश्या अनेक ठिकाणी त्यांनी पोलीस निरिक्षक या पदावरती काम करुन सायबर गुन्हयामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुण्यामध्ये सायबर गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये काम करीत असताना अतिशय क्लिस्ट, कठिण ऑनलाईन फसवणुकिचे गुन्हे उघड केले असून अनेक परदेशी नागरिकांना त्यांनी अटक केले आहे. तसेच त्यांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह 2019 मध्ये देखील मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र संघामध्ये पोलीस सल्लागार या पदामध्ये सक्रिय होण्यासाठी त्यांनी परिक्षा दिली होती. या परिक्षेमध्ये ते चांगल्या प्रकारे उतीर्ण होवून त्यांची संयुक्त राष्ट्र संघामध्ये पोलीस सल्लागार पदी त्यांची एक वर्षासाठी सुदान या देशात नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते सुदान या देशामध्ये तेथील पोलीस स्थानिक बॉक्स जो तयार करण्यात आला आहे त्यांना मार्गदर्शन करणे, गुन्हे प्रतिबंधात्मक उपाय करणे, तेथील जनतेला प्रबोधनात्मक काम करीत आहे. या संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेमध्ये सुदान देशातील अभयेई येथील शांतता मोहिम भारतीय महिला सैनिकांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलीस दलामध्ये काम करीत असताना त्यांनी गुन्हयांचा तपास करुन अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवून देण्याचे काम करीत असताना त्यांच्या तपासाच्या अधिकारामध्ये असलेल्या गुन्हयांमध्ये अनेक आरोपींना शिक्षा भोगायला लावली आहे. अनेक गुन्हयांमधील यशस्वी तपास करुन विशेषत करुन बलात्कार खुणांच्या अश्या गंभीर गुन्हयामध्ये त्यांच्या तपासातील आरोपींना जन्मठेप व फाशीची शिक्षा देखील झाली आहे. यामुळे उत्कृष्ट दोषसिध्दीचे पोलीस महासंचालकांचा दोन वेळा पुरस्कार देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!