3 लाखांच्या मताधिक्यासह राऊत तिसऱ्यांदा खासदार होतील

खा. विनायक राऊत यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दहशदवाद संपविण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्याकडे दिली. त्यांनी ती लीलया पेलली. २०१४ मध्ये दीड लाख मतांनी विनायक राऊत निवडून आले. २०१९ मध्ये त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आले. २०२४ मध्ये ते तीन लाख मताधिक्य घेवून निवडून येतील आणि विजयाची हॅटट्रिक साधतील, असा विश्वास तथा शुभेच्छा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खा विनायक राऊत यांना ६९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान यानिमित्त जिल्ह्यातील जेष्ठ व निष्ठावंत शिवसैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित कार्यक्रमाला आ वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आ दगडु सकपाळ, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, जेष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर, नागेंद्र परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अभय शिरसाट, अतुल रावराणे, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, नीलम पालव, शैलेश परब,
नगरसेवक बाळा नर आदी उपस्थित होते.

नागेंद्र परब:- बा नाथ पै यांचा मतदारसंघ म्हणून या लोकसभा मतदार संघाची ओळख आहे. पै यांची ओळख कायम ठेवण्याचे काम विद्यमान खा विनायक राऊत करीत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत गरिबांचे खासदार म्हणून त्यांना ओळखले जाते. यावेळी महिला शिवसेनेच्यावतीने खा राऊत यांना ओवाळण्यात आले. तसेच युवा शिवसेनेच्या वतीने हापूस आंब्याची माळ घालून अभिनंदन करण्यात आली. अभिष्टचिंतन करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी गर्दी केली होती.

error: Content is protected !!