कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील उद्योजक राजू मानकर यांच्या साईकृपा कंट्रक्शन A टू z बिल्डिंग मटेरियल सप्लायर या सना कॉम्प्लेक्स मधील विस्तारित नूतन वास्तूचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर माजी नगरसेवक तथा महापुरूष मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते करण्यात आला.
गेली पंधराहून अधिक वर्षे उद्योजक राजू मानकर हे कन्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल सप्लायरच्या माध्यमातून चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विट, डबर तसेच काँक्रीट हॉट मिक्सर, रोड रोलर, जेसीबी, जॅक यांच्यासह वाहतुकीसाठी टेम्पो व इतर साहित्य दर्जेदार व माफक दरात देण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे विश्वसनीय ठिकाण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी तसेच इतर जिल्ह्यात देखील लागलीच मटेरियल संदर्भातली वस्तू पुरवणे असा विश्वास संपादन केला. काही वर्षांपूर्वी त्यांनी या व्यवसायाचे कणकवली शहरात रोपटे लावले त्याच रोपट्याचे पंधरा वर्षाहून अधिक काळानंतर वटवृक्षात रूपांतर पाहावयास मिळत आहे. याचे कारण म्हणजे ग्राहकांचा असलेला उदंड प्रतिसाद याच जोरावर आपण व्यवसाय क्षेत्रात यापुढे ही अशीच अद्यावत सुविधा देणार असल्याचे यावेळी राजू मानकर यांनी सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी मानकर यांच्या मातोश्री चंद्रकला मानकर, पत्नी शिल्पा मानकर, मुलगी तनुश्री व वैष्णवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शुभांगी काणेकर, अजित काणेकर परिवारासह ज्येष्ठ व्यापारी बापू पारकर, कॉन्ट्रॅक्टर उमेश वायंगणकर, प्रणव कामत, भूषण शेटये, राहुल केळुसकर, आबा खोत, बंटी पेडणेकर, अँड. प्रवीण पारकर, नितीन साटम, महेश सावंत, कणकवली तालुका व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजन पारकर, बंटी भोवर, नवीन बांदेकर, सारस्वत बँकेचे मॅनेजर श्री.वालावलकर, मंदार सापळे, निवृत्ती धडाम, शिवा पेडणेकर यांच्यासह जिल्ह्यातील व्यावसायिक व राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवाराने भेट देत शुभेच्छा दिल्या.