समीरकाका खूपच छान ! कणकवलीसह परिसरातील छोट्यांच्या प्रतिक्रिया
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सार्यकाळ यादगार ठरली आहे कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर ‘एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, विविध खेळ खेळणी, मिकी माऊस, कार्टून्स, जादूचे प्रयोग सोबत संगीत किलबिल जल्लोष या साऱ्याचा मनमुराद आनंद लुटत लहान मुलांनी अक्षरशः धम्माल केली.











