कोकणातल्या मातीतला ‘पिकोलो’ 26जानेवारीला चित्रपटगृहात

कणकवली (स्वप्निल तांबे) : मनोरंजनाची चौकट न मोडताही आशयपूर्ण आणि जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट प्रेक्षकाच्या प्रसत्तीस उतरताहेत ‘पिकोलो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या संगीतमय चित्रचौकटीतून एका कलावंताच्या भावविश्वाचा प्रवास सुरेखरित्या उलगडण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारील ‘पिकोलो’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे जगण्याची प्रेरणा देणारा आशय सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे ‘पिकोलो’ चित्रपट फोटिंगो मोशन पिक्चर प्रा.लि. प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘पिकोलो’ चित्रपटाची निर्मिती राजेश मुद्दापूर यांनी केली आहे.

‘पिकोलो’ संगीतप्रेमी कलावताची गोष्ट आहे संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीत साधनेत येणाऱ्या अडथळ्यावर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘मिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे पहाण रंजक ठरणार आहे.

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असूनया दोघांसोबत पिकलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खड़पकर दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वैगुर्लेकर, विश्वजीत अंगव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुकड याची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!