बिडवाडी माजी सरपंच संदीप चव्हाण यांचे निधन

लीलावती हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

कणकवली (प्रतिनिधी) : बिडवाडी गावचे माजी सरपंच संदीप प्रभाकर चव्हाण ( वय 54 ) यांचे लीलावती हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान आज दुपारी दुःखद निधन झाले. बिडवाडी गावच्या विद्यमान सरपंच पूजा प्रशांत चव्हाण यांचे ते थोरले दिर होत.संदीप चव्हाण हे दानशूर व्यक्तीमत्व म्हणून समाजात परिचित होते. मागील काही वर्षे त्यांची प्रकृती खालावली होती. मागील काही दिवस त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू होते. वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चत पत्नी मुलगे मुली भाऊ वहिनी असा परिवार आहे.

error: Content is protected !!