पाच शेर पाणी जाळणारी नवसाला पावणारी म्हणून देवी अनभवानी प्रसिद्ध
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात शिर्डी चे साईबाबा यांच्यानंतर पाचशेर पाणी जाळणाऱ्या डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार 2 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे. या जत्रेला मोठया प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक अनभवानी मातेच्या दर्शनाला येतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन असणारी भवानी लोकांना अनुभव द्यायला लागली म्हणून ती अनभवानी या नावाने नावा रूपाला आली. नवसाला पावणाऱ्या देवी अनभवानी मातेच्या यात्रे दिवशी पाचशेर पाणी कोहळ्यात ओतून पेटविले जाते.
यावेळी डामरे गावातील 12 पाचाचे मानकरी उपस्थित असतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देव तरंग अनभवानी मातेच्या उगम स्थानाकडे गाव सवारी घेऊन जातात. नंतर कानडे वाडी येथे असणाऱ्या ब्राह्मणाची भेट घेतल्यावर देव तरंग देवळात जातात. अशी पूर्ण प्रदक्षिणा झाल्यावर तिसऱ्या दिवशी यात्रा समाप्त होते.या यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाविकांना डामरे ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ यांच्या वतीने माजी सरपंच बबलू सावंत यांनी केले आहे.