माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी च्या 2013-14 एसएससी बॅच विद्यार्थ्यांकडून प्रशालेला हार्मोनियम प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या सन 2013-14 दहावी बॅच कडून प्रशालेला हार्मोनियम प्रदान करण्यात आला.

यावेळी माजी विद्यार्थी ॲड.प्रसाद सावंत,दयानंद घाडीगावकर,प्रथमेश मुळ्ये व प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते. बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री विजय सावंत ,सचिव प्रकाश सावंत ,सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापकसुशांत पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.प्रशालेला या अगोदर माजी विद्यार्थ्यांमार्फत नवीन स्वच्छतागृह , सीसीटीव्ही कॅमेरे ,वायफाय, सोलार सिस्टिम,पोर्टेबल साऊंड सिस्टिम,तसेच आर्थिक मदत असे विविध स्वरूपात शाळेला सहकार्य होत आहे.सर्वच माजी विद्यार्थ्यांचे शाळा व संस्थेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!