कणकवली (प्रतिनिधी) : गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वाडो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्यातील तायक्वांडो राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
तायक्वाडो फेडरेशन ऑफ इंडिया च्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांडो अससोसिएशन च्या सहकार्याने तायक्वाडो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंडोअर स्टेडियम पेडम, म्हापसा गोवा येथे तीन दिवस होणार आहेत.13 ते 15 डिसेंबर या तीन दिवसात होणाऱ्या या खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी देशाच्या विविध राज्यातून पंच निवडीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधून एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल तायक्वांडो अससोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेशराव कर्रा, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील यांनी अभिनंदन केले.
त्याच बरोबर तायक्वाडो अससोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग चे पदाधिकारी राष्ट्रीय तायक्वाडो प्रशिक्षक व पंच भालचंद्र कुळकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे,अमित जोशी आदींनी अभिनंदन केले.