आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच, फोंडाघाट पंचक्रोशीत फटाके आणि घोषणांनी जल्लोष  !

सर्वांनी एकमेकांना साखर-पेढे वाटत आपला आनंदोत्सव साजरा केला

आनंद व्यक्त करून फोंडाघाट च्या विकास कामांकडे विशेष लक्ष दिला जाईल अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त होत आहे.

फोंडाघाट (प्रतिनिधी) : युती शासनाच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभामध्ये कणकवली-  देवगड -वैभववाडी तालुक्याचे कार्यक्षम आमदार नितेश राणे यांनी शपथ घेताच, फोंडाघाट एसटी स्टँड बाजारपेठे आणि म. गांधी चौकात  फटाक्यांची आतषबाजी  करण्यात आली. “नितेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है | हिंदुत्वाचा विजय असो | जय भवानी, जय शिवाजी | अशा बुलंद घोषणांनी संपूर्ण फोंडाघाट परिसर दुमदुमला. कार्यकर्त्यांनी लाडू -पेढे -साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी हेमंत राणे., दर्शना पेडणेकर, तन्वी मोदी, सुजाता हलदिवे, भरत चीके, सिद्धेश पावसकर ,मामा हळदीवे, राजन चिके, रमेश राणे, अजित नाडकर्णी, पिंटू पटेल, अजय चीके आणि पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!