वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष

न्यूज ब्युराे (नवी दिल्ली) : वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची आग्रही मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन केली. यावेळी कोकण रेल्वेच्या अनेक समस्या, स्थानकाचे प्रश्न मांडतानाच मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेच्या थांबे देण्याबाबतही त्यांनी रेल्वे मंत्र्याचे लक्ष वेधले. जिल्हा मुख्यालयातील सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकांवरील सुविंधाबाबतही खा.नारायण राणे यांनी सांगतानाच या रेल्वेस्थानकावर ४ एक्सप्रेसना थांबा मिळण्याची मागणीही केली. कोल्हापुर मार्गाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी रेल्वेमंत्र्यांनी आश्वासीत केले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटी दरम्यान खा.नारायण राणे यांनी आपल्या मागण्यांबाबत निवेदनही सादर केले. रेल्वेमंत्र्याचे लक्ष वेधताना २०१६ रोजी घोषणा झालेला प्रस्तावीत वैभववाडी- -कोल्हापुर (आचीर्णे जंक्शन) रेल्वे लाईन निर्मीतीला चालना देण्याची मागणी केली. निवेदनात खा.राणे म्हणतात,वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे लाईन बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६ मध्ये केली होती. तेव्हापासून मी या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद केली, परंतु रेल्वे बोर्डाने त्यास मान्यता दिलेली नाही यामुळे हा प्रकल्प मागे पडत आहे.
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची लांबी १०७ किमी आहे. कोल्हापूर-वैभववाडी सेक्शनचे बांधकाम केवळ कोकण रेल्वेसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरेल. हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडेल, किनारपट्टीच्या प्रदेशात बंदरे आणि बंदरांचा विकास करेल आणि सीमावर्ती भागातून किनाऱ्यापर्यंत मालाची वाहतूक सोपी होईल.राज्य विकासाची नवी भरारी घेईल.म्हणून आपणास विनंती आहे की आपण या प्रकरणी वैयक्तिकरित्या लक्ष घालून वैभववाडी कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची सूचना संबंधितांना करावी.अशी मागणी खा.नारायण राणे यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग स्थानकावर लवकरच पीआरएससह अनेक सुविधा मिळणार
नागपूर एक्स्प्रेस,पुणे एक्स्प्रेस,गांधीग्राम एक्सप्रेसह अन्य गाड्यांना ‘सिंधुदुर्ग’ थांबा द्या
माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात तातडिने सेवा देण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मत मांडले आहे. सिंधुदुर्ग स्थानक हे जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयात आहे. प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्व असूनही या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिंधुदुर्गा स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ,सिंधुदुर्ग स्टेशनवर PRS सुविधा उपलब्ध करून द्या.या स्टेशनसाठी अमृत भारत स्टेशन योजना आणि एक स्टेशन एक उत्पादन योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना द्या. या स्थानकावर प्रवाशांसाठी एलईडी इंडिकेटर आणि बारमाही सावलीयुक्त प्लॅटफॉर्मची गरज आहे.
तसेच सिंधुदुर्गातून धावणाऱ्या 11099/110100 LTT मडगाव-LTT एक्स्प्रेस,०११३९/०११४० नागपूर-मडगाव-नागपूर एक्स्प्रेस,१६३३६/१६३३७ गांधीग्राम-नगरकोइल एक्स्प्रेस,
22149/22150-पुणे-एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसना या स्थानकावर थांबा द्या.यामागण्या लवकरच मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा.राणे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!