शेतकऱ्यांच नुकसान करणाऱ्या माकडांना प्रतिबंध करा.वनविभागाकडूनही सकारात्मक प्रतिसाद -अनुप दयानंद नाईक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माकडांपासून होणाऱ्या त्रासामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाले आहेत. नारळ,सुपारी,केळी,पपई अश्या अनेक फळबागांची नासाधुस होत आहे.या संदर्भात हुमरस मधील काही शेतकऱ्यांनी हुमरस माजी सरपंच अनुप दयानंद नाईक यांच्याकडे तक्रार केली, त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज तातडीने अनुप नाईक यांनी माजी उपसरपंच संतोष परब यांच्यासह माजी जि.प.सदस्य राजु कवीटकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक डॉ. लाड यांची भेट घेऊन वनविभागाचे लक्ष वेधले.

सध्या माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होत आहे. यावर अनेक उपाययोजना शेतकर्यांनी आपल्या स्तरावर करायचा प्रयत्न केला पण त्याला सरवलेली माकडे जुमानत नव्हती.त्यामुळे दिवसेंदिवस नासधूस वाढत होती याच अनुषंगाने आज वनविभागाचे अधिकारी लाड याच्याशी झालेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाला असुन येत्या 2 दिवसात माकड पकडणारी यंत्रणा हुमरस मध्ये येऊन माकडांना पकडुन संरक्षित जंगलात नेऊन सोडणार आहेत, असे आश्वासन लाड यांनी दिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!