मंत्री नितेश राणे यांच्या शपथवीधीनंतर वैभववाडीत जल्लोष

भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत साजरा केला आनंदोत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) : नागपूर येथे महायुतीचे मंत्री यांचा शपथविधी पार पडला. कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच वैभववाडी भाजपाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यालयासमोर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, बबलू रावराणे, रोहन रावराणे, रणजीत तावडे, श्रद्धा रावराणे, प्रदीप रावराणे, सुभाष रावराणे, संतोष बोडके, रवींद्र तांबे, परशुराम इसवलकर, पुंडलिक पाटील, संताजी रावराणे, इब्राहिम काझी, शिवाजी राणे, उदय पांचाळ, अक्षय पाटील, गणेश मोहिते, आशिष रावराणे, दीपक माईणकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!